Pune : नवले ब्रिजजवळ भरधाव ट्रकचा टायर फुटून भीषण अपघात, एकजण ठार तर 8 जण जखमी

Policenama October 6th, 2020 03:00

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – कात्रज बाह्यवळण येथून नवले ब्रिजकडे येत असताना भरधाव ट्रकचा पुढचा टायर फुटून झालेल्या भीषण अपघात (accident) एकाची जागीच मृत्यू झाला. तर या ट्रकने जवळपास 4 कार आणि 8 दुचाकी वाहनांना उडवले आहे. यात 9 व्यक्ती जखमी झाल्या आहेत. त्यात 5 व्यक्ती गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात आले. दरम्यान अपघाता(accident)नंतर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. ती आता पोलिसांनी सुरळीत करण्यास सुरुवात केली आहे.

ट्रक क्रमांक (एमएच. 12. एचसी. 7299) हा ट्रक साहित्य घेऊन जात होता. यावेळी बाबाजी पेट्रोल पंपासमोर वेगात असणाऱ्या या ट्रेकचे समोरच्या बाजूचे डाव्या साईडचे टायर फुटले. यामुळे चालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे त्याने 4 कारला आणि 8 दुचाकीला उडवले. यात एकाच जागीच मृत्यू झाला.

असा झाला अपघात

सकाळची साडे आकरा वाजण्याच्या सुमारास कात्रज देहू रोड बाह्यवळण सतत रस्त्यावर गर्दी असते. त्यावेळी अचानक पाठीमागून एक ट्रक भरधाव वेगात बाबाजी पेट्रोल पंपासमोर आला आणि त्याचे पुढचे डाव्या बाजूचे टायर बस्ट झाला. त्यातच ब्रेक फेल झाले व त्याने समोर गर्दीमुळे हळू जाणाऱ्या वाहनांना उडविण्यास सुरुवात केली.


त्याने समोर असणाऱ्या 4 कार व 8 दुचाकीना उडवले, असे प्रत्यक्ष दर्शीने सांगितले. यामध्ये दुचाकी ट्रक खाली आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. आणि एकच गोंधळ झाला. नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. प्रथम भारती विद्यापीठ वाहतूक विभाग घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर जखमींना तात्काळ नवले रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच क्रेनने द्वारे अपघात ग्रस्त वाहने वाजुला काढली. तसेच वाहतूक सुरळीत केली.

Disclaimer: The views, thoughts and opinions expressed in the article belong solely to the author and not to RozBuzz.

rozbuzz Powered by RozBuzz
view source

Hot Comments

Recent Comments