Health Tips: आंघोळ करताना आपल्या शरीराच्या 'या' भागावर चुकूनही लावू नका साबण; अन्यथा उद्भवू शकतात आरोग्याशी संबंधित समस्या

LATESTLY October 6th, 2020 06:35

Health Tips: शारीरिक स्वच्छता राखण्यासाठी (Physical Cleanliness) दररोज आंघोळ करणं खूप महत्वाचं आहे. आंघोळ केल्याने शरीरातील ताजेपणाची भावना निर्माण होते. बहुतेक लोक आंघोळ करताना आपल्या शरीराच्या सर्व अवयवांवर साबण लावतात आणि चांगले घासतात. हे बरोबर आहे का? वास्तविक विज्ञानाच्या मते, निरोगी राहण्यासाठी आंघोळ करणे आवश्यक आहे. परंतु यासाठी काही नियम बनवले गेले आहेत, जे आपण बर्‍याचदा पाळण्यास विसरतो किंवा बहुतेक लोकांना आंघोळीसंबंधित नियमांबद्दल माहिती नसते. आंघोळ करताना आपण आपल्या शरीराच्या सर्व भागांवर साबण लावला तर सावधगिरी बाळगा कारण, असे करणे आपल्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते. त्यामुळे आरोग्याच्या गंभीर निर्माण होऊ शकता.

शरीराच्या काही भागांवर साबण लावल्याने आरोग्याशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. म्हणून विज्ञानदेखील आपल्या शरीराच्या या भागांवर साबण लावण्यास परवानगी देत ​​नाही. शरीराच्या कोणत्या भागावर साबण लावू नये (Do Not Apply Soap On This Body Part) आणि आंघोळीसंबंधी कोणते नियम पाळले पाहिजेत हे या लेखातून जाणून घेऊयात... (हेही वाचा - )

प्रायव्हेट पार्टवर साबण लावू नका -

आंघोळ करताना शरीराच्या खाजगी भागावर साबण लावणे टाळा. कारण प्रायव्हेट पार्टवर साबण लावल्याने त्वचा मऊ होते आणि तेथे खाज सुटण्याची समस्या उद्भवण्याची शक्यता असते. तुम्ही प्रायव्हेट पार्टवर साबण लावत असल्यास असे करणं थांबवा. जर आपल्याला खाजगी अवयवामध्ये खाज सुटण्याची समस्या होत असेल तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या. अन्यथा हे एखाद्या मोठ्या आजाराचे कारण बनू शकते. (हेही वाचा - )

आंघोळ करताना या गोष्टींची काळजी घ्या -

प्रायव्हेट पार्टवर साबण न लावण्याशिवाय, आंघोळ करताना इतरही अनेक गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. जेणेकरून आपण स्वत: ला विविध आजारांपासून वाचवू शकतो. चला तर मग आंघोळीदरम्यान घ्यावयाच्या काळजीविषयी काही खास गोष्टी जाणून घेऊयात.

  • आंघोळ केल्यावर टॉवेलने शरीर रगडणं टाळा. असे केल्याने तुमची त्वचा कोरडी पडेल आणि शरीरावरील केस गळू शकतात.
  • आंघोळ करताना तुम्ही 2-3 वेळा साबण वापरत असाल, तर असे करणं टाळा. खरं तर साबणाच्या जास्त वापरामुळे जास्त घाम येतो आणि त्वचा कोरडी होते.
  • आंघोळीनंतर बरेच लोक डियो आणि अँटी-बॅक्टेरियाचा वापर करतात. परंतु, याचा वापर केल्यामुळे त्वचा कोरडी होते. ज्यामुळे त्वचेला खाज सुटण्याची समस्या उद्भवू शकते. कालांतराने ही समस्या गंभीर त्वचा रोग बनू शकते.
  • याशिवाय जिममधून आल्यानंतर लगेच आंघोळ करणे तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. वास्तविक, व्यायामामुळे आपले शरीर उबदार होते. अशा परिस्थितीत त्वरित आंघोळ केल्याने ताप किंवा सर्दी होण्याचा धोका वाढतो.
  • तसेच आंघोळ करताना कंडिशनर आणि शैम्पूचा जास्त वापर टाळा. कारण, बाजारात सापडणारे केमिकल समृद्ध शैम्पू आणि कंडिशनर आपल्या केसांची समस्या कमी करण्याऐवजी वाढवू शकतात.
    आंघोळीशी संबंधित या गोष्टींची काळजी घेत आपण आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांच्या धोक्यापासून स्वत: ला वाचवू शकता. विशेषत: आपल्या खाजगी भागावर साबण न वापरणे शहाणपणाचं ठरणार आहे.
    टीप - या लेखात दिलेली सर्व माहिती केवळ माहितीच्या उद्देशाने लिहिलेली आहे. आम्ही त्याची वास्तविकता, अचूकता आणि विशिष्ट परिणामांची हमी देत ​​नाही. आम्ही असा दावा करीत नाही की, या लेखात नमूद केलेल्या टिप्स पूर्णपणे प्रभावी आहेत किंवा नाहीत. म्हणून कृपया कोणत्याही टिप किंवा सूचना अंमलात आणण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Disclaimer: The views, thoughts and opinions expressed in the article belong solely to the author and not to RozBuzz.

rozbuzz Powered by RozBuzz
view source

Hot Comments

Recent Comments